आम्ही मवाबवासीयांच्या गर्वाविषयी व अहंकारविषयी ऐकले आहे. ते दांडगट व बढाईखोर आहेत. पण त्यांच्या बढाया निरर्थक आहेत.
Cross references
गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.
मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”
तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा पुसला जाईल. अधोलोकाशी तुमचा झालेला करार तुम्हांला उपयोगी पडणार नाही.“कोणीतरी येईल आणि तुम्हाला शिक्षा करील. तुमचा कचरा करून तुम्हाला पायाखाली तुडवील.
खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
“आम्ही चांगले सैनिक व शूरवीर आहोत’ असे तुम्ही म्हणू शकत नाही.
“मवाब परमेश्वरापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजला म्हणून, तो, मद्यप्याप्रमाणे झोकांड्या खाईपर्यंत त्याला शिक्षा करा. तो स्वत:च्याच वांतीत पडून लोळेल. लोक त्याची टर उडवतील.
“आम्ही मवाबच्या गर्वाविषयी ऐकले आहे. तो फारच गर्विष्ठ होता. तो स्वत:ला विशेष समजे. तो नेहमी बढाया मारीत असे. तो फारच दुराभिमानी होता.”
मवाब या राष्ट्राचा नाश होईल. का? कारण त्याने स्वत:ला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले.”
तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार, ते मूर्ख माणंसांसारखे होतील. बाबेलच्या सैनिकांना ठार मार, ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला.
तुझ्या गर्वाने तुला मूर्ख बनविले. उंच कड्यावरील गुहांत तू राहतोस. तुझे घर टेकडीवर उंच ठिकाणी आहे. म्हणून स्वत:शी म्हणतोस, ‘मला कोणीही खाली जमिनीवर आणू शकत नाही.”‘
परमेश्वर म्हणतो, “यवाबच्या व अम्मोनच्या लोकांनी काय केले, ते मला माहीत आहे त्यांनी माझ्या माणसांना ओशाळवणे केले. माझ्या माणसांची जमीन काबीज करुन त्यांनी स्वत:च्या देशाचा विस्तार केला.
त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, पण दीनावर कृपा करतो.” नीतिसूत्रे 3:34