Home Bibles यशया 14:16 · मराठी बायबल
यशया 14:16 · मराठी बायबल

लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील. तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील, “पृथ्वीवर सगळीकडे ज्याने प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?

Cross references

स्तोत्रसंहिता 52:7

व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”

स्तोत्रसंहिता 58:10

वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.

स्तोत्रसंहिता 64:9

देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.

यशया 14:4

त्या वेळी बाबेलोनच्या राजाबद्दलचे हे गाणे तुम्ही म्हणायला लागाल, राजा आमच्यावर राज्य करीत.असताना नीचपणे वागत होता, पण आता त्याची सत्ता नष्ट झाली.

यिर्मया 50:23

बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.

यिर्मया 51:20

परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.

यहेज्केल 32:27

पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.

हबक्कूक 1:17

त्याच्या जाळ्याच्या मदतीने तो संपत्ती घेतच राहणार का? कोणतीही दया न दाखविता, तो लोकांचा नाश करीतच राहणार का?

Interlinear

Choose Theme