त्या वेळी बाबेलोनमधील प्रजा घायाळ हरणाप्रमाणे पळ काढेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते सैरावैरा धावतील. प्रत्येकजण आपल्या देशात व आपल्या लोकात पळून जाईल.
Cross references
तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.
लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल. देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील. लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल. वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
“तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल. तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल. तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”
बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.
आम्ही बाबेलला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्वपदावर येणे शक्य नाही, तेव्हा आपण तिला सोडून आपापल्या देशात जाऊ या. स्वर्गातील देव बाबेलच्या शिक्षेबद्दल आणि भवितव्याबद्दल निर्णय घेईल.
पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.