पण इस्राएलने चांगल्या गोष्टी नाकारल्या म्हणून शत्रू त्याचा पाठलाग करतात.
Cross references
तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील.
“शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर. ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.
आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हाला पकडण्यासाठी ते वाळवंटात दडून बसले.
परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला
आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते.