Home Bibles होशेय 4:6 · मराठी बायबल
होशेय 4:6 · मराठी बायबल

“माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश झाला. तुम्ही शिकण्याचे नाकारले आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या सेवेत याजक होण्यास नकार देईन. तुम्ही तुमच्या देवाचा नियम विसरलात, म्हणून मी तुमच्या मुलांना विसरेन.

Cross references

1 शमुवेल 2:12

एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती.

1 शमुवेल 2:28

इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले.

1 शमुवेल 3:12

एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे.

2 राजे 17:16

परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळणे इस्राएल लोकांनी अजिबातच थांबवले. त्यांनी वासरांच्या दोन सुवर्णमूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बालदेवतेची त्यांनी पूजा केली.

2 इतिहास 15:3

इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते

ईयोब 36:12

परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल. त्यांना ज्ञान न होता मरण येईल.

स्तोत्रसंहिता 18:27

परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.

स्तोत्रसंहिता 119:61

वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 119:139

माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.

नीतिसूत्रे 1:30

तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही.

नीतिसूत्रे 19:2

काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.

यशया 1:3

गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.”

यशया 3:12

लहान बालके मोठ्यांचा पराभव करतील. अबलांचे राज्य येईल. माझ्या लोकांनो, तुमच्या मार्गदर्शकांनी तुम्हाला योग्य मार्गापासून परावृत्त केले व चुकीच्या मार्गाने नेले.

यशया 5:13

परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील.

यशया 17:10

असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत.

यशया 27:11

वेली सुकतील, त्यांच्या फांद्या तुटून पडतील आणि, बायका त्या सरपणासाठी वापरतील. लोक समजून घेण्याचे नाकारतात. म्हणून त्यांना घडविणारा देव त्यांची समजूत घालणार नाही. आणि तो त्यांच्यावर दया करणार नाही.

यशया 28:7

पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.

यशया 29:12

किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”

यशया 45:20

“तुम्ही लोक दुसऱ्या राष्ट्रातून पळालेले आहात. तेंव्हा गोळा व्हा आणि माझ्यासमोर या. (हे लोक स्वत:जवळ खोट्या देवाच्या मूर्ती बाळगतात. ते त्या त्यांना वाचवून न शकणाऱ्या देवांची हे लोक प्रार्थना करीत राहतात. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही.

यशया 56:10

रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.

यिर्मया 2:8

“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध गेले. संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले. त्यांनी निरुपयोगी मूर्तीची पूजा केली.”

यिर्मया 4:22

देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत. ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख मुले आहेत त्यांना समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”

यिर्मया 5:3

हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी एकनिष्ठपणे वागायला हवे आहे. तू यहूदातील लोकांना चोपलेस पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत. तू त्यांचा नाश केलास, पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला. ते फार दुराग्रही झालेत. त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही.

यिर्मया 5:21

ऐका! ‘तुम्हा मूर्खाना अक्कल नाही. तुम्हाला डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही.

यिर्मया 8:7

आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.

होशेय 2:13

“तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:

होशेय 4:1

इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका! ह्या देशात राहणाव्या लोकांविरुध्द परमेश्वर आपले म्हणणे मांडणार आहे. “ह्या देशातील लोकांना परमेश्वराची खरीखुरी ओळख नाही. ते सत्याने वागत नाहीत आणि परमेश्वराशी एकनिष्ठ नाहीत.

होशेय 4:12

माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले.

होशेय 6:6

का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.

होशेय 8:1

“रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत

होशेय 8:12

मी एफ्राईमसाठी जरी 10,000 नियम लिहिले, पण एफ्राईमने ते परक्यासाठी असल्याप्रमाणे मानले.

होशेय 8:14

इस्राएलने राजवाडे बांधले. पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे. पण मी यहूदातील गावाला आग लावीन आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”

होशेय 9:17

ते लोक माझ्या परमेश्वराचे ऐकणार नाहीत. म्हणून तोही त्यांचे ऐकणार नाही. आणि ते बेघर होऊन राष्ट्रांतून भटकतील.

होशेय 13:6

मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले व ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.

जखऱ्या 11:8

एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला व त्या माझा तिरस्कार करु लागल्या.

जखऱ्या 11:15

मग परमेश्वर मला म्हणाला, “आता, मेंढ्या वळविण्यासाठी मूर्ख मेंढपाळ कदाचित वापरतील अशा वस्तू शोधून काढ.

मलाखी 2:1

“याजकांनो, हा नियम तुमच्यासाठी आहे. माझे म्हणणे ऐका. मी काय म्हणतो तिकडे लक्ष द्या. माझ्या नावाला मान द्या.

मलाखी 2:7

परमेश्वराची शिकवण याजकांना माहीत असली पाहिजे. लोकांना याजकांकडून देवाची शिकवण घेता यावी. याजक लोकांसाठी देवाचा दूत असावा.”

मत्तय 1:6

इशाय दावीद राजाचा पिता होता. दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)

मत्तय 15:3

येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?

Interlinear

Choose Theme