जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वत:च्याच नावाने शपथ वाहिली.
Cross references
नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली.
परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इसहाकला वचन दिले.
“मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल.
पण जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाहीत, तर परमेश्वर काय म्हणतो पाहा, मी, परमेश्वर, वचन देतो की राजवाड्याचा नाश होऊन येथे दगडविटांचा ढिगारा होईल.”
परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.”
मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही.
हे देवा, याकोबशी प्रामाणिक राहा. अब्रहामबद्दल तुला असलेले खरे प्रेम दाखव. फार पूर्वी तू आमच्या पूर्वजांना दिलेले वचन पाळ.
हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते.