Home Bibles इब्री लोकांस 5:11 · मराठी बायबल
इब्री लोकांस 5:11 · मराठी बायबल

याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हांला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.

Cross references

1 राजे 10:1

शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.

यशया 6:10

लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”

मत्तय 13:15

कारण या लोकांचे अंत:करण कठीण झाले आहे त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांनी आपले डोळे मिटले आहेत. यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये आपल्या अंत:करणाने समजू नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. यशया 6:9-10

मार्क 8:17

ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय?

मार्क 8:21

मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हांला समजत नाही काय?”येशू बेथसैदा येथील आंधळ्याला बरे करतो

लूक 24:25

मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.

योहान 6:6

(फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.)

योहान 16:12

“मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 28:27

कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही. आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले असते आणि मी त्यांना बरे केले असते.’

2 पेत्र 3:16

त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेतज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यासकरुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वत:चा नाश करुन घेतात.

Interlinear

Choose Theme