ज्या वेदीवरील अन्र खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही. अशी वेदी आपल्याकडे आहे.
Cross references
अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.
“तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहात: बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले.
तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.
वस्तुस्थिती अशी आहे की फक्त भाकरीचा एकच तुकडा आहे म्हणजे आपण सर्व एकाच शरीरापासून आहोत, आपण पुष्कळजण एक भाकर, एक शरीर आहोत. कारण आपला सर्वांचा त्या भाकरीत भाग आहे.
नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण ते लोक करतात ते अर्पण भुतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही!