Home Bibles इब्री लोकांस 1:12 · मराठी बायबल
इब्री लोकांस 1:12 · मराठी बायबल

तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.”स्तोत्र. 102:25-27

Cross references

निर्गम 3:14

मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग.

स्तोत्रसंहिता 90:4

तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.

स्तोत्रसंहिता 102:26

जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.

योहान 8:58

येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.”

इब्री लोकांस 13:8

येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे.

याकोब 1:17

प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते.

Interlinear

Choose Theme