Home Bibles हबक्कूक 2:13 · मराठी बायबल
हबक्कूक 2:13 · मराठी बायबल

त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात करावयाचे सर्वशक्तिमान परमेश्वराने ठरविले आहे. त्यांच्या कामाचा काहीही उपयोग होणार नाही.

Cross references

उत्पत्ति 11:6

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्याची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील,

2 शमुवेल 15:31

एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.”

ईयोब 5:13

13तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिध्दीस जात नाही. (मसलत फुकट जातेते दिवसासुध्दा ठेचाळतात.

स्तोत्रसंहिता 39:6

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

स्तोत्रसंहिता 127:1

जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.

नीतिसूत्रे 21:30

परमेश्वर ज्याच्या विरुद्व आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.

यशया 41:5

अती दूरच्या सर्व स्थळांनो, पाहा आणि भिऊन असा! पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो, भीतीने थरथर कापा! इकडे या आणि माझे ऐका.” आणि ते आले.

यशया 50:11

“पाहा! तुम्ही लोक स्वत:च्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वत:चा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वत:च पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”

यशया 55:2

जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.

यिर्मया 51:58

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “बाबेलची जाड मजबूत तटबंदी जमीनदोस्त केली जाईल. तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. बाबेलचे लोक खूप मेहनत करतील. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. शहर वाचविण्याच्या प्रयत्नात ते पार दमून जातील. ते सरपणाप्रमाणे होतील.”

यिर्मया 51:64

मग असे म्हण ‘बाबेल बुडेल पुन्हा ती कधीही वर येणार नाही. कारण मी तिच्यावर भयंकर संकटे आणीन.’ आणि बाबेलचे लोक थकून जातील.”येथे यिर्मयाचे बोलणे संपले.

मलाखी 1:4

अदोमचे लोक कदाचित् असे म्हणतील, “आमचा नाश झाला. पण आम्ही परत जाऊन आमची गावे वसवू.”पण सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “जर त्यांनी त्यांची गावे पुन्हा वसाविली, तर मी पुन्हा त्यांचा नाश करीन.” लोक अदोमला दुष्टांना देश म्हणतात. लोक म्हणतात, की परमेश्वर कायम त्या देशाचा तिरस्कार करील.

Interlinear

Choose Theme