अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
Cross references
मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला,
अब्राहामाने ही किंमतच असल्याचे समजून घेतले व त्याने एफ्रोनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे चांदीची दहा नाणी (म्हणजे चारशे शेकेल भार रुप्याची नाणी) तोलून दिली.
इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहराचा मुलगा एप्रोन हित्ती याच्या मम्रेच्या पूर्वेकडे असलेल्या शेतातील मकपेला गुहेत सारेच्या जवळ पुरले;
अब्राहामाने हित्ती लोकांकडून विकत घेतलेली हीच ती गुहा.
लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.
तर मला मिसरमधून बाहेर घेऊन जा व माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या कबरस्तानात मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “बाबा! तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन असे वचन देतो.”
त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले.
नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.