तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”
Cross references
परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिबकेदार व बांडे एडके तसेच ठिबकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली; गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यांवर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;
आपल्या मुलीशी त्या मुलाने भयंकर वाईट कर्म करुन तिला भ्रष्ट केले हे याकोबास समजले परंतु त्याची सर्व मुले गुरांढोरांबरोबर रानात होते म्हणून ते घरी येईपर्यंत त्याने या बाबतीत काहीही केले नाही.
एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले.
योसेफ एकटाच एका मेजावर बसला होता. त्याचे भाऊ दुसऱ्या मेजावर एकत्र बसले; मिसरचे लोक आणखी दुसऱ्या मेजावर बसले कारण इब्री लोकांबरोबर जेवणे चुकीचे आहे असे ते मानीत.
तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो.
माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे.
परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसरच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करतील व आम्हाला मारून टाकतील.