कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, म्हणून कनानातून पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते.
Cross references
त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; तेथे पाऊस पडला नाही आणि अन्नधान्य उगवले नाही. म्हणून अब्राम मिसरमध्ये राहाण्यास गेला.
पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला.
परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते.
मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.
यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)