Home Bibles उत्पत्ति 40:23 · मराठी बायबल
उत्पत्ति 40:23 · मराठी बायबल

परंतु त्या प्यालेबरदाराने योसेफासंबंधी तो काहीच बोलला नाही. अशा रीतीने त्या प्याले बरदाराला योसेफाविषयी विसर पडला.

Cross references

एस्तेर 6:3

त्यावर राजाने विचारले, “त्याबद्दल मर्दखयचा सन्मान कसा केला गेला? त्याला काय इनाम दिले?”तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “मर्दखयसाठी काहीच केले गेले नाही”

ईयोब 19:14

माझे नातलग मला सोडून गेले. माझे मित्र मला विसरले.

स्तोत्रसंहिता 31:12

मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.

स्तोत्रसंहिता 31:13

लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.

स्तोत्रसंहिता 105:19

योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.

उपदेशक 9:15

पण त्या शहरात एक विद्धान होता. तो विद्धान गरीब होता. पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरुन गेले.

आमोस 6:6

तुम्ही दिमाखदार प्यालांतून मद्य पिता. तुम्ही चांगली अत्तरे वापरता. पण योसेफच्या वंशाचा नाश होत आहे, ह्याचा तुम्हाला खेदही वाटत नाही.”

Interlinear

Choose Theme