मी फारो राजाचा मद्याचा प्याला धरुन उभा होतो; तेव्हा मी ती द्राक्षे घेऊन त्या प्यालात पिळली; आणि मग द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
Cross references
फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
तो आपले गाढव अगदी चांगल्याद्राक्षवेलीस बांधून ठेवील; तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल;
“जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे.
त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांच्या पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्रृर्याने थक्क झाली.
त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्यांची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे मद्यपरिचारक आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
तेव्हा, हे परमेश्वरा, माझी विनवणी कृपा करुन ऐक. मी तुझा सेवक आहे. तुझ्या नावाविषयी भीतियुक्त आदर दाखवण्याची इच्छा असलेल्या तुझ्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐकावीस. मी राजाचा मद्य चाखणारा सेवकआहे, हे परमेश्वरा, तुला हे माहीत आहेच. तेव्हा कृपा करून आज माझ्या मदतीला ये. राजाजवळ मी मदतीची करीन तेव्हा मला साहाय्य कर. मला यश दे आणि राजाची मर्जी राखण्यात मला मदत कर.
नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.