हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “याचा अर्थ तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार असे तुला वाटते काय?” त्याच्या त्यांच्याविषयीच्या या स्वप्नामुळे तर त्याचे भाऊ आता त्याचा अधिकच द्वेष करु लागले.
Cross references
आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करु लागले. यासेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले.
माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या; आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला; तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही. परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.’
त्या माणसने उत्तर दिले, “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? मला सांग! तू कालजसे त्या मिसरच्या माणसाला जिवे मारलेस, तसे मला मारावयास पाहातोस काय?”तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता सर्वाना माहीत झाले आहे.”
पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली
अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपळी मेंढरे कोणापाशी सोडून आलास? मला माहीत आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुसती लढाई बघत बसायला आलास.”
या गीतामुळे शौलची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय”
ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत त्यांनी त्याच्यामागे एक शिष्टमंडळ पाठविले, व सांगितले की, “या माणसाला आमचा राजा करु नका.”
येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,““तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नकारला तोच कोनशिला झाला’
या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद.पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’
“मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते.
तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!