Home Bibles उत्पत्ति 37:24 · मराठी बायबल
उत्पत्ति 37:24 · मराठी बायबल

नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले.

Cross references

उत्पत्ति 42:21

ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.”

स्तोत्रसंहिता 35:7

मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

स्तोत्रसंहिता 40:2

परमेश्वराने मला विनाशाच्याखड्‌यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले.

स्तोत्रसंहिता 88:6

तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.

स्तोत्रसंहिता 88:8

माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.

स्तोत्रसंहिता 130:1

परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.

यिर्मया 38:6

मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला मल्कीयाच्या पाण्याच्या टाकीत टाकले, (मल्कीया राजपुत्र होता) राजाचे पहारेकरी राहत असलेल्या मंदिराच्या चौकात ही टाकी होती. त्या अधिकाऱ्यांनी दोरांच्या साहाय्याने यिर्मयाला पाण्याचा टाकीत उतरविले. त्या टाकीत पाणी अजिबात नव्हते, फक्त चिखल होता. यिर्मया त्या चिखलात रुतला.

विलापगीत 3:52

निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखी माझी शिकार केली आहे.

विलापगीत 4:20

आमच्या दृष्टीने राजा सर्वश्रेष्ठ होता. तो आमचा श्वास होता. पण त्यांनी राजाला सापळ्यात पकडले. प्रत्यक्ष परमेश्वरानेच राजाची निवड केली होती. राजाबद्दल आम्ही असे म्हणालो होतो, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रांपासून आमचे रक्षण करतो.”

जखऱ्या 9:11

यरुशलेम, तुझ्या करारारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही रक्त वापरले. म्हणून मी जमिनीतील खळग्यात बंदिस्त असलेल्या तुझ्या लोकांना मुक्त करतो.

Interlinear

Choose Theme