Home Bibles उत्पत्ति 35:17 · मराठी बायबल
उत्पत्ति 35:17 · मराठी बायबल

परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”

Cross references

उत्पत्ति 30:24

राहेल म्हणाली, “देवाने माझी लाजीरवाणी स्थिती दूर करुन मला मुलगा दिला आहे.” म्हणून राहेलीने त्याचे नाव योसेफ ठेवले.

1 शमुवेल 4:19

एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली.

1 शमुवेल 4:20

तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,” पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली.

Interlinear

Choose Theme