Home Bibles उत्पत्ति 34:30 · मराठी बायबल
उत्पत्ति 34:30 · मराठी बायबल

परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील; आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्वलोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”

Cross references

उत्पत्ति 12:2

मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,

उत्पत्ति 12:6

अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.

उत्पत्ति 12:12

म्हणून मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील ‘ही त्याची बायको आहे.’ आणि मग तुझ्या साठी ते मला मारुन टाकतील;

उत्पत्ति 13:7

शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती.

उत्पत्ति 28:13

याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन

उत्पत्ति 46:27

योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.

उत्पत्ति 49:5

“हे भाऊ आहेत; या दोन भावांना तरवारींने लढण्याची आवड आहे.

निर्गम 5:21

तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणले, “आम्हाला जाऊ द्यावे असे फारोला विचारून तुम्ही मोठे वाईट केले. फारो व त्याचे अधिकारी यांच्या मनात आमच्या विरुद्ध द्वेष निर्माण केल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला शिक्षा करो. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांना चांगले निमित्त दिले आहे.”

अनुवाद 4:17

जमिनीवरील प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,

अनुवाद 7:7

परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.

यहोशवा 7:25

तेव्हा यहोशवा म्हणाला, “तुझ्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. पण आता परमेश्वरच तुला संकटात टाकील” मग सर्व लोकांनी आखान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर ते मरेपर्यंत दगडांचा मारा केला. मग त्यांना सर्व चीजवस्तूसह जाळून टाकले.

1 शमुवेल 13:4

सर्व इस्राएसांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला.

1 शमुवेल 16:2

तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.” परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. “मी परमेश्वराला यज्ञ कायला चाललो आहे” असे म्हण.

1 शमुवेल 27:1

पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्ट्यांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेव्हाच इस्राएलमध्ये माझा शोध घ्यायचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावडीतून सुटका होईल.

1 शमुवेल 27:12

दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”

2 शमुवेल 10:6

आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने धेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.

2 शमुवेल 16:21

अहिथोफेल त्याला म्हणाला, “घराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या दासी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटतो ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठींबा मिळेल.”

1 राजे 11:25

अरामवर रजोनने राज्य केले. इस्राएलबद्दल त्याला चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलला बराच त्रास दिला.

1 राजे 18:18

एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही. ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरु झाला.

1 इतिहास 2:7

जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत:जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.

1 इतिहास 16:12

देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा. त्याने केलेले न्याय आणि चमत्कारची कृत्ये यांचे स्मरण करा.

1 इतिहास 16:19

त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, परक्या प्रदेशात उपरे होता.

1 इतिहास 19:6

आणि दावीदाचे वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली.

स्तोत्रसंहिता 105:12

अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.

नीतिसूत्रे 11:17

दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.

नीतिसूत्रे 11:29

जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल.

नीतिसूत्रे 15:27

जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.

रोमकरांस 4:18

आपल्या अंत:करणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगाणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो ‘अनेक राष्टांचा पिता’ झाला.

Interlinear

Choose Theme