हमोर व शखेम त्या नगरातील वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले. ते म्हणाले,
Cross references
मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल.
त्या वेळी तेथे एफ्रोन हित्ती हा हेथी लोकान बसलेला होता; तो त्या सर्वांच्या देखत अब्राहामाला म्हणाला,
तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मगारा.
बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.
रोज लौकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोले. चौकशी करुन तो विचारी, “तू कोणत्या शहरातून आलास?” तो सांगत असे.“मी इस्राएलच्या अमुक अमुक वंशातला”
“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो.
संदेष्टे चव्हाट्यांवर जाऊन लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, पण अशा संदेष्ट्यांचा लोक तिरस्कार करतात. संदेष्टे सरळ, चांगल्या सत्याची शिकवण देतात. पण लोक त्यांचा रागच करतात.
का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
दुष्टाव्याचा तिरस्कार करा व चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपाकरील.
पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेतेवेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल.