Home Bibles उत्पत्ति 33:11 · मराठी बायबल
उत्पत्ति 33:11 · मराठी बायबल

म्हणून मी आग्रहाची विनंती करतो की मी आपणाला भेट देतो तिचा स्वीकार करा. देवाने माझे कल्याण केले आहे. माझ्यापाशी माझ्या गरजा पुरुन उरेल एवढे आहे.” या प्रमाणे भेटी दाखल दिलेल्या देणग्या घेण्यासाठी याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली म्हणून मग एसावाने त्या देणग्यांचा स्वीकार केला.

Cross references

उत्पत्ति 30:43

अशा प्रकारे याकोब अतिशय श्रीमंत झाला; त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

उत्पत्ति 32:13

त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली.

उत्पत्ति 32:14

त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके,

उत्पत्ति 32:21

म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली परंतु तो त्या रात्री तळावरच मागे राहिला.

उत्पत्ति 33:9

परंतु एसाव म्हणाला, “माझ्या बंघु तू मला काही भेट द्यावयाची नाही, मला माझ्याकरिता भरपूर आहे.”

यहोशवा 15:19

अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.

शास्ते 1:15

अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले.

1 शमुवेल 25:27

मी आत्ता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या.

1 शमुवेल 30:26

दावीद सिकलाग येथे आला. त्याने अमालेक्यांकडून आणलेल्या लुटीतील काही वस्तू आपले मित्र, यहूदातील वडीलधारी मंडळी यांना पाठवल्या. त्याने सांगितले, “परमेश्वराच्या शत्रूकडून आणलेल्या लुटीतीला ही भेट”

2 राजे 2:17

पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.”मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.

2 राजे 5:15

नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”

2 राजे 5:23

नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या.

लूक 14:23

मालक नोकराला म्हणाला, “रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल.

रोमकरांस 8:31

यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?

1 करिंथकरांस 3:21

म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

2 करिंथकरांस 6:10

दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.

2 करिंथकरांस 9:5

म्हणून मला हे आवश्यक आहे की, बंधूनी आम्हांला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विंनति करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे, तिच्याविषयीची व्यावस्था संपवावी. मग ती उदारहस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही.

फिलिप्पैकरांस 4:11

मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे.

फिलिप्पैकरांस 4:18

माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणार असा आहे.

1 तीमथ्याला 4:8

कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

Interlinear

Choose Theme