उत्पत्ति 31:43 · मराठी बायबल
3लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या कन्या आहेत आणि त्यांची मुले माझ्या ताब्यात आहेत आणि ही जनावरेही माझीच आहेत; येथे तू जे पाहतोस ते सर्व माझे आहे; परंतु माझ्या मुली व त्यांची मुले यांना ठेवून घेण्यासंबंधी मी काही करु शकत नाही.
Cross references
उत्पत्ति 31:55
दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या कन्या व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.
उत्पत्ति 37:35
याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला.