Home Bibles उत्पत्ति 31:38 · मराठी बायबल
उत्पत्ति 31:38 · मराठी बायबल

मी तुमची वीस वर्षे सेवाचाकरी केलेली आहे. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरु मेलेले जन्मले नाहीं; आणि तुमच्या कळपातील एकही एडका मी खाल्या नाही.

Cross references

उत्पत्ति 30:27

लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो.

उत्पत्ति 30:29

याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता; आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत;

उत्पत्ति 30:30

मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वत:साठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.

निर्गम 23:26

तुमच्या सर्व स्त्रिया मुलेबाळे प्रसवतील कोणीही वांझ असणार नाही; जन्म देताना त्यांचे एकही बाळ मरणार नाही. आणि मी तुम्हाला दीर्घायुषी करीन.

अनुवाद 28:4

परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.

यहेज्केल 34:2

“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वत:च फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही?

Interlinear

Choose Theme