Home Bibles उत्पत्ति 31:27 · मराठी बायबल
उत्पत्ति 31:27 · मराठी बायबल

तू मला न सांगता का पळून गेलास? तुला जायचे आहे असे तू मला सांगितले असतेस तर नाचगाणी बजावणी व संगिताची धामधूम या सहित मी तुला मेजवानी दिली असती;

Cross references

उत्पत्ति 4:21

आदाला आणखी एक मुलगा झाला. (त्याचे नाव युबाल; हा याबालाचा भाऊ); युबाल तंतुवाद्दे, व वायुवाद्दे म्हणजे वीणा व बासरी वाजविणाऱ्या कलावंताचा मूळ पुरुष झाला.

उत्पत्ति 24:59

तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली;

उत्पत्ति 31:3

परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”

उत्पत्ति 31:20

याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण येथून निघून आपल्या देशाला जात आहो हे त्याने लाबानास सांगितले नाही;

उत्पत्ति 31:31

याकोबाने उत्तर दिले, “मी तुम्हाला न सांगता निघालो कारण मला भीती वाटली; मला विचार आला की तुम्ही तुमच्या मुली माइयापासून घेऊन जाल;

निर्गम 15:20

त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

शास्ते 6:27

तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवव्व्या न करता रात्री केले.

ईयोब 21:11

दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.

नीतिसूत्रे 26:23

दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.

Interlinear

Choose Theme