त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता; तो गेला असताना राहेल त्याच्या घरात गेली आणि तिने आपल्या बापाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
Cross references
माझ्या स्वामीने मला शपथ घ्यावयास लावले व सांगितले, तू माझ्या बापाच्या देशात माझ्या आप्ता कडे, गणगोताकडे जा व तेथून माझ्या मुलाकरिता तू नवरी शोधून आण.’
तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?”
परंतु मी तुमच्या कुलदेवता मुळीच चोरल्या नाहीत. जर येथे माझ्याबरोबर असणाऱ्या कोणी तुमच्या कुलदेवता घेतल्या आहेत असे तुम्हाला आढळले तर ती व्यक्ती ठार केली जाईल; तुमची माणसे या बाबतीत माझे साक्षी असतील; तुमच्या कोणत्याही चीजवस्तूसाठी तुम्ही झडती घेऊ शकता; जे काही तुमचे असेल ते घेऊन जा.” (राहेलीने लाबानाच्या कुलदेवाता चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.)
राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत.
तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला;
आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले.
मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो.फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.
पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौंड रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली.
त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले.
यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे”
मंदिर शिलो येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची पूजाअर्चा करत होते.
मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.
दोन वर्षानंतर, मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते. अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
यहूदा आणि यरुशलेममध्ये लोक पुजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले.
बाबेलचा राजा ह्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार योजना आखत आहे, हेच ह्यावरुन दिसून येते. दोन रस्ते जेथून फुटतात, त्या नाक्यावर बाबेलचा राजा आला आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी त्याने काही मंत्र-तंत्र केले आहेत. त्याने काही बाण हलविले, आपल्या कुलदैवताला प्रश्र्न विचारले, त्याने बळी दिलेल्या प्राण्याचे यकृत निरखिले.
ह्याचप्रमाणे, पुष्कळ दिवस इस्राएली लोकांना राजावाचून वा नेत्यावाचून काळ कंठावा लागेल. त्यांना बळी, स्मृतिशिळा, एफोद वा घराण्याचा देव यांच्यावाचून राहावे लागेल.