तो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.”
Cross references
एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.
मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.
मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रुंनी पाहिला.
म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.
परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळकोणी राहू शकेल का?”
पुरूष तुझा देह पाहतील आणि तुझा भोग घेतील. तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन. आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
तुम्हाला माझी उठवण झाली नाही. तुम्ही माझी दखलही घेतली नाही. मग तुम्ही कोणाची काळजी करीत होता? तुम्ही कोणाला भीत होता? तुम्ही खोटे का बोललात? पाहा! मी बराच वेळ गप्प बसलो आणि तुम्ही माझा मान ठेवला नाहीत.
जेव्हा जेव्हा आमचे अंत:करण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंत:करणापेक्षा देव महान आहे, आणि सर्वकाही (तो) जाणतो.
तुम्ही म्हणाता,‘मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होतनाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात.
“पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपलेकपडे तयार ठेवतो तो धन्य.”