Home Bibles उत्पत्ति 29:23 · मराठी बायबल
उत्पत्ति 29:23 · मराठी बायबल

त्या रात्री लाबानाने आपली थोरली मुलगी लेआ याकोबाच्या स्वाधीन केली; त्या रात्री याकोब व त्याची बायको लेआ यांनी एकत्र निजून विवाहाच्या जीवनाचा आनंद उपभोगला;

Cross references

उत्पत्ति 24:65

तिने सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला तरुण पुरुष कोण आहे?”सेवकाने उत्तर दिले, “तो माझ्या स्वामीचा पुत्र आहे.” तेव्हा रिबकेने बुरख्याने आपले तोंड झाकून घेतले.

उत्पत्ति 38:14

तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता.

मीखा 7:5

तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मित्रावरही विश्वासून राहू नका. तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.

Interlinear

Choose Theme