Home Bibles उत्पत्ति 29:20 · मराठी बायबल
उत्पत्ति 29:20 · मराठी बायबल

म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.

Cross references

उत्पत्ति 24:67

6मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले; त्या दिवशी रिबका त्याची बायको झाली; इसहाकाचे रिबकेवर फार प्रेम जडले; त्यामुळे आपल्या आईच्या मरणानंतर रिबकेमुळे त्याला समाधान मिळाले.

उत्पत्ति 29:27

तरी परंतु हा लग्न विधी सप्ताह सोहळा साजरा करण्यात सहभागी हो म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी राहेलही देतो; परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”

उत्पत्ति 29:30

तेव्हा मग याकोब राहेलीशीही एकत्र निजला; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवा चाकरी केली.

उत्पत्ति 30:26

मला माझ्या बायका व माझी मुले द्या; मी कष्टाने तुमची सेवाचाकरी करुन ती मिळवली आहेस, मी चौदा वर्षे तुमची चांगली सेवा केली आहे हे तुम्ही जाणता.”

उत्पत्ति 31:15

आम्ही परक्या असल्यासारखे त्यानी आम्हाला वागवले त्याने आम्हांस तुम्हाला विकून टाकले आहे आणि आमचे सर्व पैसे खर्च करुन टाकले.

उत्पत्ति 34:19

दिनाच्या भावांनी जे सांगितले ते लवकर करण्यास शखेमाला तर फारच उत्साह व आनंद वाटला.शखेम त्यांच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता.

गीतरत्न 8:6

तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस, किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्‌का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे. त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात आणि त्याची खूप मोठी आग होते.

होशेय 12:12

“याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या.

होशेय 12:13

पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले.

1 करिंथकरांस 13:7

सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते

2 करिंथकरांस 5:14

कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले.

इफिसकरांस 5:2

आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.

Interlinear

Choose Theme