उत्पत्ति 27:30 · मराठी बायबल
इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोंच एसाव शिकारीहून आला.
Cross references
उत्पत्ति 10:9
तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे.
इब्री लोकांस 12:17
नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला. तरी आपल्या वडिलाचे मन तो बदलू शकला नाही.