मग इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला चाचपून पाहतो, मग चाचपण्यावरुन तू खरेच एसाव आहेस का? ते मला समजेल”
Cross references
माझ्या बापाने जर मला चाचपून पाहिले तर मग मी एसाव नाही हे त्यांना समजेल आणि मग फसवणूक केल्याबद्दल माझा बाप मला आशीर्वादाच्या ऐवजी शाप देईल.”
मी मात्र देवाकडे आलो आहे. आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुराक्षित जागा बनवले. देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.
मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन. माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन. मी त्या लोकांना बरे करीन. त्यांना क्षमा करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या
देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.