याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली.
Cross references
अब्राहामाने उत्तर दिले, “जेव्हा तू ह्या मेंढया माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खाणली असा तो पुरावा होईल.”
तेव्हा त्यानंतर त्या विहिरीला बैर - शेबा असे नाव पडले, कारण त्या ठिकाणी अब्राहाम व अबीमलेख यांनी एकमेकांना वचन देऊन करार केला.
नबो व बाल-मौन आणि सिबमाह ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन.