Home Bibles उत्पत्ति 25:34 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:34 · मराठी बायबल

मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.

Cross references

स्तोत्रसंहिता 106:24

परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.

उपदेशक 8:15

म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.

यशया 22:13

पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत,गुरे, मेंढ्या मारा. आपण उत्सव साजरा करू. आपण जेवण करू, मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.

जखऱ्या 11:13

तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्यालेखी माझी किंमत एवढी आहे. एवढी मोठी रक्कमतू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली.

मत्तय 22:5

नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगतले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.

मत्तय 26:15

यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.

लूक 14:18

ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, “मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’

प्रेषितांचीं कृत्यें 13:41

‘ऐका, जे तुम्ही संशय धरता! तुम्ही चकित होता पण मग दूर जाता व मरता; कारण तुमच्या काळामध्ये मी (देव) काही तरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करुन सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”‘ हबक्कूक 1:5

1 करिंथकरांस 15:32

इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”

फिलिप्पैकरांस 3:18

कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागातात.

इब्री लोकांस 12:16

कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.

Interlinear

Choose Theme