यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते;
Cross references
आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामी आणि सर्व इस्राएलयांच्यावर राजा म्हणून नेमले.
शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.
तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले. शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.
तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे. शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
अरेबियाविषयी शोक संदेशददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील काही झाडांखाली रात्र काढली.
ददान, तेमा व बूज येथील लोकांनाही मी त्या प्याल्यातून प्यायला लावले. मंदिरात दाढीच्या कडा कापणाऱ्या सर्व लोकांना मी द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.
ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन.
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.
त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील अल्लोन वृक्षापासून बनविली. त्यांनी तुझ्या डेकवरील खोली कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली व ती हस्तिदंताने सजविली.
ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत.
ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता.