Home Bibles उत्पत्ति 24:54 · मराठी बायबल
उत्पत्ति 24:54 · मराठी बायबल

मग त्याने व त्याच्या बरोबराच्या माणसांनी त्यांचे खाणेपिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला; दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते म्हणाले, “आता आम्ही आमच्या स्वामीकडे माघारी जाण्यास निघतो.”

Cross references

उत्पत्ति 24:56

परंतु तो सेवक त्यांना म्हणाला, “कृपा करुन मला थांबवून घेऊ नका; परमेश्वराने ही माझी फेरी सफळ केली आहे, तेव्हा आता मला धन्याकडे परत जाऊ द्या.”

उत्पत्ति 24:59

तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली;

उत्पत्ति 28:5

अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.

उत्पत्ति 45:24

मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला; ते निघाले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “सरळ घरी जा आणि रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”

2 शमुवेल 18:19

सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”

2 शमुवेल 18:27

पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”

नीतिसूत्रे 22:29

जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.

उपदेशक 7:10

“पूर्वी आयुष्य खूप चांगले होते.” असे कधीच म्हणू नका. “काय झाले?” शहाणपण हा प्रश्न आपल्याला कधीच विचारू देत नाही.

लूक 8:38

ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला,

Interlinear

Choose Theme