तेव्हा ती योग्य मुलगी विशेष प्रकारे असे उत्तर देईल, ती म्हणेल, “प्या बाब! आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी आणते,” असे घडेल तेव्हा ती मुलगी माझ्या धन्याच्या मुलाकरिता परमेश्वराने निवडलेली नवरी आहे असे मी समजेन.’
Cross references
परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.
मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.”
लोक निर्णय घेण्यासाठी फासे टाकतात. पण निर्णय नेहमी देवाकडून येतात.
जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.
लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.
उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वत:ला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे.
पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.