Home Bibles उत्पत्ति 21:15 · मराठी बायबल
उत्पत्ति 21:15 · मराठी बायबल

काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले;

Cross references

उत्पत्ति 21:14

दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.

निर्गम 15:22

मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी मिळाले नाही.

निर्गम 17:1

सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते.

2 राजे 3:9

इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोम यांच्या राजांबरोबर निघाला. सात दिवस त्यांनी वाटचाल केली. त्यांचे सैन्य, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे यांच्यासाठी पुरेसे पाणी नव्हते.

स्तोत्रसंहिता 63:1

देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.

यशया 44:12

एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी न मिळाल्यास तो अशक्त होतो.

यिर्मया 14:3

नेते मंडळी आपल्या नोकरांना पाणी आणण्यासाठी पाठवितात. नोकर पाण्याच्या टाक्यांकडे जातात, पण त्यांना थोडेसुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना रिकामी भांडी घेऊन परत यावे लागते. म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात.

Interlinear

Choose Theme