हे समजल्यावर अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्याला मेंढरे, बैल व दास दासीही दिल्या.
Cross references
अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली व त्याला मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले.
‘ती माझी बहीण आहे’ असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो; तिला घे व येथून निघून जा.”
अब्राहामाने सारा आपली बहीण असल्याचे लोकांना सांगितले. गराराचा राजा अबीमलेख याने हे ऐकले. त्याला सारा हवी होती म्हणून त्याने काही माणसे पाठवून तिला राजवाड्यात आणले.
तेव्हा आता तू अब्राहामाची बायको त्याची त्याला परत दे; अब्राहाम माझ्या वतीने बोलणारा संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील; परंतु तू सारेला अब्राहामाकडे परत पाठवले नाहीस तर मग मी सांगतो की तू आणि तुझ्या बरोबर तुझे सर्व कुटुंबीय खात्रीने मराल.”
मग अब्राहाम म्हणाला, “मला भीती वाटली येथील कोणीही लोक देवाचे भय धरीत नाहीत असे मला वाटले आणि म्हणून माझी बायको सारा मिळविण्यासाठी कोणीही मला ठार मारील असे मला वाटले.