दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.”
Cross references
नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”
पण तेथे लवकर पळत जा. तू तेथे सुरक्षितपणे जाऊन पोहोंचेपर्यंत मला सदोम नगराचा नाश करता येणार नाही.” (लहान असल्यामुळे त्या गांवाला तेव्हापासून सोअर असे नाव पडले.)
“सर्व लोकांना कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.”
विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस.
“अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
कारण तो म्हणतो, “माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” यशया 49:8मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.
म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी की तुमच्यावर तिच्याकोणत्याही पीडा येऊ नयेत.