उत्पत्ति 17:15 · मराठी बायबल
देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल.
Cross references
उत्पत्ति 17:5
मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.
उत्पत्ति 32:28
तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.”
2 शमुवेल 12:25
त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला नाथानने त्याचे नांव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय’ असे ठेवले. देवाच्या वतीने नाथानने हे केले.