“इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी आणि स्वतंत्र असेल. तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील; तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल, परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.”
Cross references
तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्याबरोबर राहिला; इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला; तो धनुष्यबाण मारावयास शिकला व तरबेज तिरंदाज झाला;
त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत.
जगण्यासाठी तुला झगडावे लागेल; आणि तु तुझ्या भावाचा गुलाम होशील, परंतु तू स्वतंत्र होण्यासाठी लढशील आणि तुझ्या भावाचे नियंत्रण झुगारुन देशील व त्याच्या पासून वेगळा होशील.”
रानटी गाढव माणसाला जन्म देऊ शकत नाही. आणि मूर्ख माणूस कधीही शहाणा होऊ शकणार नाही.
ईयोब, रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?