Home Bibles उत्पत्ति 11:31 · मराठी बायबल
उत्पत्ति 11:31 · मराठी बायबल

मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे (हारानाचा मुलगा) लोट, आणि आपली सून म्हणजे (अब्रामाची बायको) साराय यांना बरोबर घेऊन बाबीलोनिया मधील म्हणजे खास्द्यांच्या ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला: आणि प्रवास करीत ते हारान शहरात आले व तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी ठरविले.

Cross references

उत्पत्ति 10:19

कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.

उत्पत्ति 11:26

तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याचे मुलगे अब्राम, हारान व नाहोर हे जन्मले.

उत्पत्ति 11:32

तेरह दोनशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.

उत्पत्ति 12:4

तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता.

उत्पत्ति 12:5

हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला.

उत्पत्ति 14:12

अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले.

उत्पत्ति 15:7

देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”

उत्पत्ति 24:10

अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम - नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला.

उत्पत्ति 24:15

मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिहीपाशी आली;

उत्पत्ति 27:43

तेव्हा बाळा, मी सांगते ते कर; हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा.

उत्पत्ति 28:10

याकोबाने बैर - शेबा सोडले व तो हारानाला गेला;

उत्पत्ति 29:4

याकोब त्या मेंढपाळांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?”ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”

यहोशवा 24:2

मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो.फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.

2 राजे 19:12

त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.

नहेम्या 9:7

हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामाची निवड केलीस. बाबेलमधील (खास्द्यातील) ऊर नगरातून त्याला तू बाहेर काढून त्याला अब्राहाम असे नाव दिलेस.

प्रेषितांचीं कृत्यें 7:2

स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते.

इब्री लोकांस 11:8

जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.

Interlinear

Choose Theme