Home Bibles उत्पत्ति 10:14 · मराठी बायबल
उत्पत्ति 10:14 · मराठी बायबल

पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले.

Cross references

अनुवाद 2:23

कफतोरी लोकांबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांचा कफतोराहून आलेल्या लोकांनी उच्छेद करुन त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहात आहेत.

1 इतिहास 1:12

पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.

यशया 11:11

त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.

यिर्मया 44:1

यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस व दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता:

यिर्मया 47:4

सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे. सोर आणि सीदोन यांच्या उरलेल्या साहाय्यकांच्या नाशाची वेळ आली आहे. लवकरच परमेश्वर पलिष्ट्यांचा नाश करील. कपतोर द्विपातील वाचलेल्यांचाही तो नाश करील.

आमोस 9:7

परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएल, तू मला कूशी लोकांप्रमाणे आहेस. मी इस्राएलला मिसर देशातून बाहेर आणले. पलिष्ट्यांना मी कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले.”

Interlinear

Choose Theme