देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.
Cross references
देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.
आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
इस्राएलबद्दल परमेश्वराचा शोकसंदेश. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. माणसात आत्मा घातला. त्याने पुढील गोष्टी सांगितल्या: