देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”
Cross references
देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”
देवाने नोहाला व त्याच्या मुलांना
लाबान म्हणाला, “थांब, तुझी इच्छा असेल तर मला थोडे बोलू दे. परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो.
मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्हापाशी फार थोडी शेरडेमेंढरे होती; परंतु आता तुम्हापाशी किती तरी कळप आहेत; ज्या ज्या वेळी मी तुमच्यासाठी काही केले त्या प्रत्येक वेळी परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. आता मात्र मी स्वत:साठी काही करण्याची व माझ्यासाठी घर बांधण्याची वेळ आली आहे.
देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत;
“मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
“ईयोब, तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. बेहेमोथ गायीसारखे गवत खातो.
परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता 14000 मेंढ्या, 6,000 उंट, 2,000 गायी आणि 1,000 गाढवी आहेत.
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत. आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही.