Home Bibles गलतीकरांस 6:15 · मराठी बायबल
गलतीकरांस 6:15 · मराठी बायबल

कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवीउत्पति हीच महत्त्वाची आहे.

Cross references

रोमकरांस 2:28

कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे.

रोमकरांस 8:1

म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही.

1 करिंथकरांस 7:19

सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे.

2 करिंथकरांस 5:17

म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे!

गलतीकरांस 5:6

कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांनाकाही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.

इफिसकरांस 2:10

कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.

इफिसकरांस 4:24

नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.

कलस्सैकरांस 3:10

आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे.

प्रकटीकरण 21:5

जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही!कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”

Interlinear

Choose Theme