मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे.
Cross references
त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्या पवित्र होतात; त्या माझ्या आहेत; म्हणून त्या याजकांनी घेऊ नयेत; त्या पवित्र वस्तू घेऊन जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही माझा मान न राखता-माझे भय न धरता-माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूची त्यांनी काळजी घ्यावी.
तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे व ते दाखवावे.
मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.
लेवींविषयी मोशे असे म्हणाला,“लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
शलमोनाने मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा:सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यामाठी)चोख सोन्याच्या दीपमाळा. (या अतिपवित्र गाभाऱ्यासमोर डावीउजवीकडे पाच - पाच लावलेल्या होत्या)सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे वाडगे दिवे लखलखीत, उजळलेले ठेवायची साधने. पेले ताम्हने शुद्ध सोन्याची रक्षापात्रे मंदिराची प्रवेशद्वारे.
अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकारणे आणि होमबलीसाठी वापारायची पात्रे बनविण्यात आली. त्यानी याशिवाय सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयादाचे आयुष्य असे तोवर याजक दररोज होमबली अर्पण करत असत.
शिवाय नबुखद्नेस्सरने यरुशलेमच्या मंदिरातील वस्तू काढून ज्या ठिकाणी त्याने आपले खोटे देव ठेवले होते. अशा स्वत:च्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या राजा कोरेशने बाहेर काढल्या.
तुम्ही लोकांनी बाबेल सोडावे. ते ठिकाण सोडा, याजकांनो, पुजेचे साहित्य नेण्यासाठी स्वत:ला शुध्द करा. अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.