Home Bibles एज्रा 5:3 · मराठी बायबल
एज्रा 5:3 · मराठी बायबल

त्यावेळी ततनइ हा फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशाचा अधिकारी होता. तो, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना ततनइ व त्याच्याबरोबरच्या लोकांनी विचारले, “तुम्हाला हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?

Cross references

एज्रा 1:3

यरुशलेममध्ये असलेला देव हाच इस्राएलचा परमेश्वर आहे. तुमच्या पैकी देवाचे जे लोक असतील त्यांचे तो भले करो, अशी मी प्रार्थना करतो. त्यांना यहूदातील यरुशलेममध्ये जाऊन परमेश्वररासाठी मंदिर बांधू द्यावे.

एज्रा 4:9

मुख्य अधिकारी रहूम चिटणीस शिमशय आणि टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांच्यावरील महत्वाचे अधिकारी यांच्याकडून

एज्रा 4:12

राजा अर्तहशश्त यास आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे पोचले आहेत. ते आता पुन्हा नव्याने नगर बांधत आहेत. यरुशलेम हे वाईट शहर आहे इथल्या लोकांनी नेहमीच इतर राजांविरुध्द उठाव केला आहे. आता हे यहुदी पाया घालणे, तटबंदीची भिंत बांधणे अशी कामेकरत आहेत.

एज्रा 5:6

फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशाचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्याबरोबरचे मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत.

एज्रा 5:9

या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, “तुम्हाला हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?”

एज्रा 6:6

तेव्हा आता मी दारयावेश, फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर बोजनई आणि त्यांचे त्या प्रांतातील इतर कारभारी यांना असा आदेश देतो की त्यांनी यरुशलेममधून दूर जावे.

एज्रा 6:13

फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली.

एज्रा 7:21

आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की फरात नदीच्या पश्रिृमेकडील भागातले जे खजिनदार आहेत त्यांनी एज्राला हवे ते पुरवावे. कारण एज्रा हा स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक आणि याजक आहे. याची अंमलबजावणी पूर्णत्वाने आणि ताबडतोब करावी.

नहेम्या 2:7

मी पुढे राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मेहेरनजर असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. फरात नदीच्या पश्चिमेकडील अधिकाऱ्यांसाठी काही पत्रे मला द्यावीत. म्हणजे ती त्यांना दाखवल्यावर यहुदाच्या वाटेवर त्यांच्या हद्दीतून सुखरुप जायला ते मला परवानगी देतील.

मत्तय 21:23

येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”

प्रेषितांचीं कृत्यें 4:7

त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”

Interlinear

Choose Theme