एज्रा 5:15 · मराठी बायबल
नंतर कोरेश शेशबस्सरला (जरुब्बाबेलला)’ म्हणाला, “ही सोन्यारुप्याची पात्रे घे आणि यरुशलेममधील मंदिरात ठेव. मंदिर पूर्वी जिथे होते त्याचठिकाणी पुन्हा बांध”
Cross references
एज्रा 1:2
पारसचा राजा कोरेश म्हणतो:“स्वर्गातील देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत; यहूदातील यरुशलेम येथे त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले.
एज्रा 3:3
आपल्या लगतच्या राष्ट्रातील लोकांची धास्ती वाटत असूनही तिला न जुमानता त्यांनी वेदी बांधली जुना पाया तसाच ठेवून त्यांनी त्यावर वेदी उभारली आणि तिच्यावर ते सकाळ संध्याकाळ होमार्पणे वाहू लागले.
एज्रा 6:3
कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, देवाचे मंदिर पुन्हा बांधले जावे. तेथे यज्ञ अर्पण करता यावेत. मंदिराचा पाया बांधून काढावा. मंदिराची उंची 90 फूट आणि रुंदी 90 फूट असावी.