Home Bibles यहेज्केल 8:13 · मराठी बायबल
यहेज्केल 8:13 · मराठी बायबल

नंतर देव म्हणाला, “जर तू माझ्याबरोबर आलास, तर हे लोक आणखी भयंकर कृत्ये करीत असल्याचे तुला दिसेल.”

Cross references

यिर्मया 9:3

“ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात. त्यातून खोट्याचे बाण उडतात. ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे, हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. त्यांना माझे ज्ञान नाही.” परमेश्वर असे म्हणाला आहे.

यहेज्केल 8:6

मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”

यहेज्केल 8:15

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या भयंकर गोष्टी बघतो आहेस ना? माझ्याबरोबर ये म्हणजे तुला ह्यापेक्षा वाईट गोष्टी दिसतील.”

2 तीमथ्थाला 3:13

पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वत:ही फसून अधिक वाईटाकडे जातील.

Interlinear

Choose Theme