Home Bibles यहेज्केल 7:27 · मराठी बायबल
यहेज्केल 7:27 · मराठी बायबल

तुमचा राजा मृतांसाठी रडत असेल. नेते शोकप्रदर्शक कपडे घालतील. सामान्य लोकांची घाबरगुंडी उडेल. का? कारण त्यांच्या कर्मांचे फळ मी त्यांना देईने. मी त्यांची शिक्षा ठरवीन, आणि ती अंमलात आणीन. मगच त्या लोकांना मीच परमेश्वर असल्याचे कळून येईल.”

Cross references

1 राजे 20:28

एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.

स्तोत्रसंहिता 9:16

परमेश्वराने त्या वाईट लोकांना पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.

यशया 3:11

पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल.

यिर्मया 52:8

पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले.

यहेज्केल 7:3

आता तुमचा अंतकाळ येत आहे. मी तुमच्यावर किती रागावलो आहे ते दाखवीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कृत्यांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.

यहेज्केल 7:4

मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुमच्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला सजा देत आहे. तुम्ही फारच भयंकर कर्मे केलीत. आता तुम्हाला कळेल की मीच देव आहे.”

यहेज्केल 7:8

आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.

यहेज्केल 12:10

परमेश्वराने, त्यांच्या प्रभूने, त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. हा दु:खद संदेश यरुशलेमच्या नेत्यांबद्दल आणि इस्राएलमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांबद्दल आहे.

यहेज्केल 14:23

ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

यहेज्केल 17:15

पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”

यहेज्केल 18:30

का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.

यहेज्केल 21:25

आणि, इस्राएलच्या दुष्ट नेत्या, तुम्हाला ठार केले जाईल. तुझ्या शिक्षेची वेळ आली आहे, अंत जवळ आला आहे.”

यहेज्केल 26:16

मग समुद्रकाठाजवळच्या देशांतील सर्व नेते आपला शोक प्रकट करण्यासाठी सिंहासनावरुन खाली उतरतील. ते त्यांचे खास पोशाख उतरवितील. सुंदर वस्त्रे काढून ठेवतील. मग ते ‘थरकापाची (भीतीची) वस्त्रे’ घालतील आणि भीतीने कापत जमिनीवर बसतील. तुझा इतका लवकर नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.

योएल 3:17

“मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.

मत्तय 7:2

कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याचा न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.

रोमकरांस 2:5

पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.

याकोब 2:13

जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!

Interlinear

Choose Theme